पाकिस्तानने चोरली अमिताभची संकल्पना : ‘कोन बनेगा करोडपती’ बनविले Taxi Cash

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ । भारताने काही निर्मित केले की त्याची पाकिस्तान नेहमी चोरी केल्याचे अनेक दाखले आहेत. त्यातच आता पाकिस्तानने भारतीय टेलीव्हिजनवरील रिअॅलिटी शोजच्या संकल्पनांची चोरी केली आहे. पाकिस्ताननं अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शो च्या संकल्पनेला चोरी केल्याचं वृत्त आहे. या संकल्पनेवर आधारितच एक नवीन गेम शो पाकिस्तानच्या छोट्या पडद्यावर सुरु करण्यात आला आहे.

 

भारतातला प्रसिद्ध टेलीव्हिजन शो कौन बनेगा करोडपतीला एक नवा ट्वीस्ट देत पाकिस्तानच्या टी.व्ही इंडस्ट्रीने आपल्या इथं एक अनोखा शो सुरु केला आहे. या गेम शो मध्ये स्पर्धक स्टुडिओतील हॉट सीटवर बसून नाही तर चालत्या गाडीत बसून प्रश्नांची उत्तरं देणार आहेत,या शो चे नाव आहे Taxi Cash. दोन वेगवेगळ्या शो च्या संकल्पनांना चोरी करत हा नवा शो पाकिस्तानमध्ये सुरु करण्यात आला आहे. त्यातला एक आहे अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ आणि दुसरा ‘Carpool Karaoke’.या शो ला पाकिस्तानचा आरजे,होस्ट आणि अभिनेता खालिद मलिक होस्ट करत आहे. खालिद मलिक पाकिस्तानच्या रस्त्यांवर कार चालवत या क्वीज शोला होस्ट करणार आहे. शो च्या संकल्पनेच्या संदर्भात बोलताना खालिद मलिक म्हणाला आहे की,”शो ची संकल्पना अशी आहे की,प्रवाशाला गाडी सर्वप्रथम बुक करायला लागेल. मग मी त्या प्रवाशाला पॉइंट A ते पॉइंट B जे काही ठरलं असेल तसा प्रवास घडवेन. आणि त्या प्रवासा दरम्यान मी त्याला प्रश्न विचारणार. बरेचसे प्रश्न हे जनरल नॉलेजवर आधारित असतील. वेगवेगळे राऊंडस् त्यात असतील आणि प्रत्येक राऊंड गणिक प्रश्न कठीण होत जातील”.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम