खडसेंचा भाजप प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील राजकारण बदलणार
नाथभाऊंसोबत रोहिणी खडसे ह्या देखील भाजप प्रवेश करणार?
दै. बातमीदार | ६ एप्रिल २०२४ | सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीला सोडून गेलेले नेते एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होते .मात्र, आज पुन्हा सायंकाळ पर्यंत ते पुन्हा भाजपात परतणार असल्याचे नेते एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांना माहिती दिली .
गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. त्यातूनच यासाठी ते दिल्लीला देखील जावून आल्याची अमाहिती होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेते खडसे पुन्हा भाजपात परतणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून ते आता अधिक्कृत भाजपात प्रवेश करणार आहे.
नेते एकनाथराव खडसे हे लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः माध्यमांना दिली आहे. याबाबत अद्याप पर्यंत वेळ निश्चित झालेली नाही. मात्र, तरी आज संध्याकाळपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करण्याची वेळ ठरणार आहे. एकनाथ खडसे सोबत रोहिणी खडसे ह्या देखील भाजप प्रवेश करणार काय ? याबाबत मात्र शंका कायम आहे. शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे या आगामी काळात मुक्ताई नगर विधानसभा लढवणार असून पुढचे राजकारण सोयीचे जावे म्हणून राष्ट्रवादीतच राहणार की वडिलांसोबत भाजप प्रवेश करणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
उत्तर महाराष्ट्र मध्ये संपूर्ण राजकीय गणिते खडसे यांच्या भाजप प्रवेशाने बदलणार आहे. यामध्ये खास करून रावेर लोकसभेमध्ये भाजपकडून एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. केंद्रीय पातळीवरून एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाची सूत्रे हलवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम