मोबाईलच्या किंमतीत मिळणार लॅपटॉप; आताच घ्या लाभ

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ सप्टेंबर २०२२। सध्या सुरू असलेल्या फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डे’ सेल मध्ये बऱ्याच वस्तूंवर ऑफर्स व डिस्काउंट मिळत आहे. म्हणुन आज आम्ही तुम्हाला या सेल मधील अश्या स्वस्त लॅपटॉप्स बाबत सांगणार आहोत, जे तुम्हाला एका स्मार्टफोनच्या किंमतीत मिळतील. चला तर एक नजर टाकूया या लॅपटॉप्सवर….

१. लेनोवो आयडियापॅड 3 क्रोमबुक :- आकाराने लहान व वजनाला हलका असलेला हा लॅपटॉप मुलांच्या शिक्षणासाठी किंवा ऑफिस वर्कसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ४जीबी रॅम, ६४जीबी स्टोरेज व ४२w उच्च क्षमतेची बॅटरी असलेला लेनोवो आयडियापॅड क्रोमबुक १४,९९० रुपयांना उपलब्ध असून, Axis अथवा ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास विशेष सूट पण मिळेल.

२. असुस बीआर११०० सीकेए (२०२२) :- ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज असलेला हा दमदार लॅपटॉप वेबकॅम शिल्ड सहित येतो, ज्यामुळे तुम्ही लॅपटॉपच्या कॅमेराला ऑन-ऑफ करू शकता. तसेच याची एसएसडी मेमरी ही २टीबी पर्यंत वाढविता येते. सेलमध्ये या लॅपटॉपची किंमत ₹१८,९९० रुपये आहे.

३. इंफिनिक्स एक्स१ स्लिम :- एल्यूमिनियम मेटल बॉडी, ८जीबी रॅम व २५६जीबी ची एसएसडी असलेला हा लॅपटॉप आपल्याला ₹२५,९९० रुपयांना खरेदी करता येईल, तसेच यावर एक्सचेंज आणि क्रेडिट कार्ड ऑफर्स सहित भरघोस सवलतींचाही लाभ मिळेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम