अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सोन्याचे भाव काय ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मार्च २०२३ । राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारचे नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यानंतर सोन्याचा भाव काय आहे? हे विचारले तरी अनेकांना गुदगुदल्या होतात. तर काहींना कपाळावर आठ्या येतात. काय करणार घौडदौडच सध्या तशीच सुरू आहे. मात्र होळीपूर्वी सोन्याचे दर स्थिर आहे तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली आहे.

आज 10 ग्रॅम 22 कॅरेटसाठी सोन्याची दर 51,750 रूपये आहे. तर 24 कॅरेट साठी 56,750 रुपये आहे. तर दुसरीकडे चांदीचे 10 ग्रॅमचा दर 669 रुपये आहे . तसेच मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,750 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,450 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 51,750 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,750 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 51,780 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 56,480 रुपये आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम