मनोज पाटलांनी दिले राज ठाकरेंना उत्तर : होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ नोव्हेबर २०२३

राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आता राज्यभर दौरे सुरु असून अनेक टीका देखील त्यांच्यावर होत आहे. नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती आहे. माझ्या पाठिशी मराठा समाजाची, सामान्य मराठ्याची शक्ती आहे असे मनोज जरांगे म्हणाले. तसेच दुसरी कोणतीही शक्ती माझ्यासमोर टिकणार नाही. मी मराठा समाजाच्या वेदना आणि भावना मांडत आहे. इथे लिहून देणारा कुणी नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून, पुणे, कल्याण येथून ते ठाण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांना राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १०० टक्के २४ डिसेंबरच्या आधी मराठा समाजाला आरक्षण देतील. त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट करू. सरकारकडून आम्हाला आशा आहे आणि सरकारवर विश्वासही आहे, असा विश्वास देखील मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम