…तर नेत्यांच्या घरात घुसून ; मनोज जरांगे पाटलांची मुलगी आक्रमक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ नोव्हेबर २०२३

राज्यात गेल्या दहा दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरु केले आहे तर त्यांनी पाणी देखील घेणे बंद केले होते. यावेळी त्यांच्या मुलीने थेट सरकारला दमच दिला आहे.

‘माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं, तर मी स्वतः या राजकीय नेत्यांना घरात घुसून त्यांना मारेन’ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्या लेकिन दिला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगे पाटील यांच्या मुलीने आपल्या वडिलांच्या लढ्याबाबत भाष्य केले.जरांगे पाटलांच्या चिमुकल्या लेकीनं देखील यावेळी आपल्या वडिलांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत आक्रमक भूमिका मांडली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. राज्यभरातून त्यांच्या या आंदोलनाला आक्रमक पद्धतीने मराठा बांधावांचा पाठिंबा मिळताना दिसतोय. त्याच पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली.जरांगे पाटील मात्र आपल्या उपोषणावर ठाम असल्याचे समजते. अशात जरांगे पाटील यांच्या मुलीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम