नक्षलवाद्यांनी घेतला महिन्याभरात तिघांचा बळी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ नोव्हेबर २०२३

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी आणखी एका युवकाची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रामजी आत्राम (२७, रा. कापेवंचा, ता. अहेरी, जि. गडचिरोली) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून घटनास्थळी आढळलेल्या नक्षलपत्रकात तो खबऱ्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. दक्षिण गडचिरोली भागात महिनाभरात नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, २४ नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कापेवंचा येथील रहिवासी असलेला रामजी हा युवक आपल्या शेतात काम करत होता. दरम्यान, सायंकाळी ५ च्या सुमारास काही सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्या ठिकाणी जाऊन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी रामजीची हत्या केल्याचा दावा नक्षल्यांनी घटनास्थळी टाकलेल्या पत्रकात केला आहे. मात्र, तो खबरी नव्हता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून तपासानंतर अधिक बाबी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले. महिनाभरात दक्षिण गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केली.

१५ नोव्हेंबर रोजी भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे, २३ तारखेला एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथील पोलीस पाटील लालसू वेडदा ध्दारा, कयों गालों में अगाधान तऔर सूरजकुंड रणनीतीक हमला के नाम पर प्रति अंतिकारी हमले जारी है इसके तहत पुलिस व्दारा कई तरह के लाल्य दिखा कर धोखा देकर कुछ लोगों को मुखबिर बनाया जा रहा है। पलिय की व धोयेवाजी पूर्ण बातों पर विलास करके या, कोचा औल और राजाराम PSI के साथ गमयर क में रहा कर शिक्रबार २६/९/२०१२ दल का समाचार पोलिस को दिया गेना इस हमले में ही जागा ACM शहीद आपदा आणि शुक्रवारी अहेरी तालुक्यातील कापेवंचा येथील रामजी आत्राम या युवकाची हत्या केली. तोडगट्टा येथील खाणविरोधी आंदोलन प्रशासनाकडून उधळून लावण्यात आल्यानंतर नक्षलवादी अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम