रक्षा बंधन निमित्त देशसेवा करणाऱ्या सीमेवरील जवानांना पाठील्या राख्या -एक राखी जवानांच्या सन्मानासाठी,मुंदडा विद्यालयाचा उपक्रम

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)

येथील स्व.श्री.मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार करून रक्षाबंधनानिमित्त देशसेवा करणाऱ्या सीमेवरील जवानांना पाठविल्या.या उपक्रमाचे शाळेचे हे ७ वे वर्ष आहे .
मागील सात वर्षापासून प्रत्येक वर्षी जवानांसाठी शाळेतून राख्या पाठवल्या जातात .राख्या बनवितांना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.जवान जीवाची पर्वा न करता परिवाराला सोडून ऊन, वारा ,पाऊस, डोंगर-दऱ्या ,पहाड या ठिकाणी सेवा देत आहेत. अनेक सण उत्सव परिवारात असतात .पण माझा जवान भाऊ त्यावेळेला नसतो .आणि म्हणून एक रेशमचा धागा भावाला बांधून दीर्घायुष्य परमेश्वराकडे मागत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.ही संकल्पना शाळेच्या उपशिक्षिका नेहा पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली असता विद्यार्थ्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक विद्यार्थ्यांचे वडील, भाऊ ,काका ,दादा सैन्यात आहेत. त्यांना राख्या पाठवतांना एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आनंद दिसत होता .नेहा पाटील यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. तसेच धनराज महाजन, सुनील पाटील ,किशोर पाटील ,राजेंद्र महाजन यांनी देखिल बहीण भावाच्या नात्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली .या शाळेच्या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा व इतर संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम