लाखो साईभक्त येणार शिर्डीत ; सहा लाख लाडूचे असणार नियोजन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जुलै २०२३ ।  जगभरातील अनेक साईभक्त गुरुपौर्णिमेनिम्मित शिर्डी येथे येत असता याच ठिकाणी आजपासून ते ४ जुलैपर्यत श्री साईबाबांच्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात होत आहे. सुमारे ४ लाख भाविक शिर्डीत येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या एक दिवस अगोदर शनिवारी सुमारे ७० हजार भाविकांनी दर्शन घेतले. इतर वेळी दररोज ५० ते ५५ हजार भाविक दर्शन घेतात.

यंदा एक दिवस अगोदर यात १५ हजार भाविकांची वाढ झाली. साई संस्थान प्रशासनाने भाविकांसाठी उत्सव काळात सुकर दर्शनासह निवास, भोजन प्रसादाची व्यवस्था केली. मागील वर्षी गुरुपौर्णिमेसाठी शिर्डी येथे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले होते.

गुरुपौर्णिमा ३ जून रोजी आहे. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला २ जूनपासून सुरुवात होणार आहे. यंदा गुरुपौर्णिमेसाठी दर्शनरांगेत मोफत चहा, कॉफी, पाणी देण्यात येणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यात यंदा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्टॉलमध्ये वाढ करण्यात आली. याशिवाय भाविकांसाठी भक्त निवासात लॉकरची सुविधाही यंदापासून सुरू करण्यात आली. साईबाबांचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार अाहे.

साई मंदिर आणि परिसर विविध फुलांनी सजवण्यात येणार असून विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शिर्डीत वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी जड वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात येणार असल्याने भाविकांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागणार नाही. साई प्रसादालयही भाविकांसाठी सज्ज करण्यात आले. नाष्टा पाकिटे आणि लाडू प्रसाद, बुंदी प्रसाद पाकिटांचीही निर्मिती करण्यात आली. गतवर्षी गुरुपौर्णिमेला ५.१२ कोटींचे साईचरणी दान : गुरुपौर्णिमेला गतवर्षी २०२२ मध्ये शिर्डीत तीन दिवसांत तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. साईबाबांच्या मोफत भोजन प्रसादाचा १.५० लाख भाविकांनी लाभ घेतला होता, तर भक्त निवासांमध्ये व तात्पुरत्या व्यवस्थेचा २२ हजार भाविकांना लाभ झाला. खासगी लॉजेस व हॉटेलमध्ये ७० हजार भाविकांनी निवास केला होता. मागील गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या झोळीत ५ कोटी १२ लाखांची गुरुदक्षिणा दान जमा झाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम