पवार साहेब जे बोललेले ते सत्य ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोकांसाठी देवेंद्रवासी झाली असे म्हटले होते. याबद्दल संजय राऊतांना विचारले असता, शरद पवार बोललेले आहेत. ते विचारपूर्वक बोलले असतील. त्याच्यावरती टीका-टिप्पणी करण्याची गरज नाही आणि पवार साहेब जे बोललेले आहेत ते सत्य आहे, असे राऊत म्हणाले आहेत.

नागपूरहून पुण्याकडे येत असलेल्या खाजगी बसचा समृद्धी महामर्गावर अपघात होऊन २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या या भीषण बस अपघातानंतर पोलिसांनी चासक शेख दानीश यांच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीस अटक करण्यात आली आहे. दरम्यान समृद्धी महामार्गावर सततच्या अपघातांवरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गाटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, एका बसमध्ये २६ लोकं ठार झाले म्हणून चालकावर गुन्हा दाखल केला, पण आतापर्यंत छोट्या कारमधून, स्वतःच्या वाहनांमधून लोकं जात होती त्यांचे अपघात झाले मग ते तुम्ही कोणावर गुन्हा दाखल करणार? मग हे सदोष मनुष्य वधाचे गुन्हे देवेंद्र फडणवीस स्वतःवरच दाखल करून घेत आहेत का? ते सुद्धा अपघातच आहेत ना. अनेक खाजगी वाहनांत कुटुंबासह लोक ठार झाले त्याची जबाबदारी कोण घेणार.

संपूर्ण समृद्धी महामार्गाची पुन्हा एकदा एक तांत्रिक चाचणी करावी, तसेच संपूर्ण महामार्गावर अपघाताच्या जागा कुठे आहेत? अपघात का होत आहेत? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. गेल्या काही महिन्यात या महामार्गावर 300 पेक्षा जास्त अपघात झालेले आहेत. शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत त्याच्यावरती त्यांनी बोलावं असेही राऊत यावेळी म्हणाले.

बसच्या अपघातात लोक ठार झाले यामुळे अख्या देशांमध्ये आहाकार झाला. पण साधारण १०० पेक्षा जास्त लोक आणि कुटुंब जेव्हा इतर मरण पावली त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. मग या सरकारवरती समृद्ध महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. हे सराकर फक्त ठेकेदारांच्या माध्यामातून आपल्याकडे खोके यावेत यासाठी नवे प्रकल्प काढले जात आहेत. ठेकेदार सांगतील तशी कामे केली जात आहेत.समृद्धी महामार्गाचा गाडा घसरत गेला तो ठेकेदारांमुळे झालं. श्रेय घेण्याच्या लढाईमुळे अनेक गोष्टी घसरत गेल्या असेही संजय राऊत म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम