आंदोलनाचा शिंदे गटाच्या मंत्र्यांना फटका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑक्टोबर २०२३

राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा समाजाचे जोरदार आंदोलन सुरु आहे तर आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखील शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांना आंदोलकानी घेरले आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी केली.

नेत्यांना गावबंदी असताना मंत्री अब्दुल सत्तार यांचे भाऊ गफ्फार हे निमखेडा ते जिवरग टाकळी प्रवास करत होते. त्यांच्या गाडीवर विधानपरिषद सदस्याचे स्टीकर आंदोलनकर्त्यांना दिसून आले. यावेळी त्यांनी गाडी थांबवत अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सांगितली आणि घोषणाबाजीनंतरच त्यांना पुढे जाऊ दिले. अब्दुल सत्तारांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशी घोषणा त्यांचे बंधू अब्दुल गफ्फार यांनी मराठा आंदोलकासह उभे राहत दिली आहे.

सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बंधू अब्दुल गफ्फार हे निमखेडा ते जिवरग टाकळी प्रवास करत असताना मराठा समाज बांधवानी त्यांची गाडी थांबवत त्यांना अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास भाग पाडले. सरकारविरोधी घोषणा करत आंदोलकांनी गाडीवरील विधानसभेचा लोगो काढून आपला संताप व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम