तरुणाच्या खुनाने पुन्हा एकदा भुसावळ हादरले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ ऑक्टोंबर २०२३

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात नेहमीच गुन्हेगारीने चर्चेत असते. गेल्या काही दिवसापासून एकाच दिवशी तीन खुनाच्या घटनेने भुसावळ शांत होत नाही तोच आज पुन्हा एकदा ३१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला चढवीत खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात पूर्व वैमनस्यातून नाजीर शेख नशीर (वय ३१) या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला मृत घोषीत केले. मयत नाजीर शेख नाशिर याच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात काळीज पिळवटून काढणारा शोक व्यक्त केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम