बातमीदार | २९ सप्टेंबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात बाप्पांची विसर्जनाची मोठी धामधूम सुरु असतांना एक दुर्देवी बातमी समोर आली असून तलावात बुडून ३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तीन मृतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड तिघेही मुलं पोहायला पाझर तलावात गेले होते. मात्र यावेळी पाण्याचा आंदाज न आल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. यात देवानंद पिराजी गायकवाड (वय १५ वर्ष), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२ वर्ष) व वैभव पंढरी दुधारे (वय १५ वर्ष, सर्व रा. बामणी) अशी त्यांची नवे आहेत. देवानंद व बालाजी हे दोघेही सख्खे भाऊ होते तर वैभव हा आई वडिलांचा एकूलता एक मलगा होता. मुले बुडाली आहेतट ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्या सारखी पसरली.यावेळी त्यांना शोधण्यासाठी सर्वच लोक तलावाच्या दिशेने धावले. अखेर तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक गणेशराव सोंडारे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, बीट जमादार प्रभाकर गुडमलवार यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककाळा पसरली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम