अजित पवार गटाचे आमदार थोडक्यात बचावले ; गर्डर कोसळल्याची घडली होती घटना !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ ऑक्टोबर २०२३

राज्यातील अनेक महामार्गावात दुरुस्तीचे काम सुरु असतांना मुंबई-गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचं देखील काम सुरु होते. यादाम्यान गर्डर कोसळल्याची धक्कादायक घडना घडली होती. हि घटना चिपळूणमधील बहादूर शेखनाका उड्डाणपुलावर घडली. सकाळच्या सुमारास गर्डरला तडे गेले होते, त्यानंतर दुपारी पूर्ण गर्डर कोसळला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम पाहणी करत असताना हा गर्डर कोसळला आहे.

सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, या घटनेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम थोडक्यात बचावलेत. शेखर निकम यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बांधकाम सुरू असलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी आमदार शेखर निकम गेले होते. पुलाच्या खाली उभे राहूनच ते अधिकाऱ्यांना सूचना देत होते. त्याचवेळी पुलाचा मोठा आवाज झाला. पूल कोसळत असल्याचं लक्षात आलं आणि काही क्षणात आमदार निकम यांच्यासह त्या ठिकाणी उपस्थित असलेले अधिकारी बाजूला झाले. त्यानंतर काही क्षणातच गर्डरसह उड्डाणपूल कोसळला. आमदार निकम यांच्यासह उपस्थित अधिकारी वेळीच बाजुला झाल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आमदार निकम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्याला दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम