मनसे व शिंदे युती ? ठाकरे शिंदेंच्या भेटीला

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ ऑक्टोबर २०२२ ।  अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटील अचानक गेल्याने राज्यात एकच राजकीय खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का याकडे लक्ष असणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असून भाजपसोबत युती करणार नसल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे कुणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष लागलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर राज ठाकरे त्यांची भेट घेणार असून ते रवाना झाले आहेत. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि ठाकरे गटाने मोर्चेबांधणी केली असून एकमेकांविरूद्ध दंड थापटले आहेत. तर ऋतुजा लटके यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा स्विकारला जात नसल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. पण कोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम