योगगुरू बाबा रामदेव यांचे वादग्रस्त विधान ; शाहरुख खान पासून अभिनेत्रींचा चांगलाच समाचार

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ ऑक्टोबर २०२२ ।  मुरादाबादेतील आर्यवीर संमेलनात योगगुरू बाबा रामदेव चांगलेच संतापलेले दिसून आले त्यांनी यावेळेस बॉलिवूडमधील शाहरुख खान, आमीर खान पासून अभिनेत्रींचा चांगलाच समाचार यावेळी त्यांनी घेतला

योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, बॉलिवूडमधील शाहरुखचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला. तो तुरुंगात गेला. सलमानही ड्रग घेतो. आमीर घेतो की नाही माहिती नाही बॉलिवूडच ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहे. अभिनेत्रींचे तर देवच जाणो, असे वादग्रस्त विधान यांनी केले आहे.
इस्लाममध्ये कुणी मद्यपान केले तर तो अपवित्र होतो. पण जिन्ना मद्यपान करत होते. ते वारले…चांगले झाले. इस्लाममध्ये मद्यपानाविषयी कठोर नियम आहे.

त्यामुळे ते बिडी-सिगारेटची नशा करतात. आज संपूर्ण देशात आर्य समाज हा एकमेव पवित्र समाज आहे. या समाजाचे लोक कोणत्याही प्रकारची नशाबाजी करत नाहीत. बाबा रामदेव यांनी आर्य समाजाच्या व्यासपीठावरून देशाला नशामुक्त करण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले की, इस्लाममध्ये मद्यपान करणाऱ्या अपवित्र मानले जाते, तर तुम्हीही ऋषींचे वंशज आहात. तुम्ही दारू, ड्रग, सिगारेट व इतर अंमली पदार्थ का सोडत नाही. आर्यवरी दलाच्या कार्यकर्त्यांनी देश नशामुक्त करण्यासाठी मोहीम राबवली पाहिजे.

बाबा रामदेव यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ड्रग्जवर हल्लाबोल करताना केली. पहिला हल्ला त्यांनी बॉलिवूडवर केला. ते म्हणाले- मोठ-मोठे सिनेस्टार ड्रग्ज घेतात. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री, बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहे. यापूर्वी सलमान खानचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला हे तुम्ही पाहिले असेलच. तो तुरुंगातही गेला. रामदेवांनी दोनवेळा सलमानचे नाव घेतले. त्यानंतर आसपासच्या लोकांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी शाहरुखच्या मुलाला ड्रग्ज घेताना पकडले, सलमानही ड्रग्ज घेतो, अशी दुरुस्ती केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम