भावी नवऱ्यात कोणते गुण हवे म्हणजेच ३६ गुण 

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ ऑक्टोबर २०२२ ।  पूर्वा पवार नाटक, मालिका, सिनेमा, मॉडेलिंग अशा विविध प्लॅटफॉर्मवर वावरलेली पूर्वा अनेक दिवसांनी मोठ्या पडद्यावर ‘३६ गुण’ सिनेमाच्या माध्यमातून दिसणार आहे. समित कक्कड दिग्दर्शित ‘३६ गुण’ सिनेमाच्या ट्रेलरची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.  पूर्वा पवार हि अभिनेते प्रमोद पवार यांची मुलगी असूनही तिनं आपली स्वतंत्र ओळख इंडस्ट्रीत केली आहे. सिनेमातील तिचं बिनधास्त वागणं, बोल्ड सीन्स आणि एकंदरीत लग्न या महत्त्वाच्या विषयावरचं तिचं थेट मत तिनं एका मुलाखतीत बोलून दाखवत दिलखुलास संवाद साधला आहे.

३६ गुण हा सिनेमा लग्नसंस्थेवर भाष्य करतो. पण सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या पूर्वाचा मात्र लग्न संस्थेवर विश्वासच नाही. तिनं आपले बेधडक विचार याविषयी मांडले आहेत.

याच मुलाखतीत पूर्वानं लीव्ह इन रिलेशनशीपवर देखील बिनधास्त भाष्य केलं आहे,तिची मतं आजच्या तरुणाईला भावतील एवढं मात्र नक्की. आपण जर कधी मनात विचार आला लग्नाचा तर लव्हमॅरेज की अरेंज मॅरेज करु याविषयी मत व्यक्त करताना पूर्वानं आपल्या भावी नवऱ्यात कोणते गुण असावेत हे देखील सांगितलं आहे बरं का. पण सध्या तरी लग्न नाहीच या मतावर आपण आहोत,भविष्यात माहित नाही असं म्हणाऱ्या पूर्वानं अनेक इंट्रेस्टिंग गप्पा मारल्या आहेत .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम