मनसे नेत्याचे मोठ वक्तव्य : मनातील मुख्यमंत्री केवळ…

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ ऑक्टोबर २०२३

देशात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुक होत असल्याने सर्वच पक्षांनी पक्षाच्या कामांना सुरुवात केली आहे. यात मनसे देखील अॅक्टिव्ह मोडवर आहे. निवडणुकीआधी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार देखील समोर येत आहे. त्यात आता राज ठाकरे यांचं देखील नाव समोर आलं आहे. राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं वक्तव्य मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती. संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतल्याची माहिती अभिजीत पानसे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली होती, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

अभिजीत पानसे यांनी म्हटलं की, राजसाहेब मनसे नेत्यांची बैठक घेत असतात. संपूर्ण महाराष्ट्रचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. कोकणचा रस्ता असो, मराठी माणसाचं घरं खाली करणं असो, या सर्व मुद्द्यांसाठी राज साहेब पुढे राहिले आहेत. मुंबईत मराठी माणूस हरवून गेला आहे. मराठी पाट्यांच्या विषय राज साहेबांनी मांडला. मनसेने आंदोलने केली आणि संपूर्ण आढावा घेऊन आम्ही आता पुढे येत आहोत. अनेक लोकं बोलली मनसेच्या बाजूने वातावरण आहे. राज साहेब लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत आणि त्यासाठी आम्ही काम करायला लागलो आहोत, असं अभिजीत पानसे यांनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम