…तेव्हा एकनाथ शिंदे नगरसेवक होते ; संजय राऊत !
बातमीदार | २ ऑक्टोबर २०२३
शिवसेनेच्या परंपरेचाच एक भाग असलेला शिवतीर्थावरील (शिवाजी पार्क) दसरा मेळाव्यावरून आता शिवसेनेच्या दोन गटामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतांना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, तेव्हा एकनाथ शिंदे फक्त ठाण्याचे नगरसेवक होते. ते नंतर आमदार, मंत्री झाले. त्यामुळे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. संजय राऊत झाले, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आहे. याच शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे कार्याध्यक्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे पक्षाच्या कार्यकारिणीतही नव्हते. ते तेव्हा फक्त ठाण्याचे नगरसेवक होते. नंतर उद्धव ठाकरेंनीच त्यांना आमदार, मंत्री बनण्याची संधी दिली. दरम्यान, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी शिंदे गटानेही महापालिकेकडे अर्ज केल्याचे वृत्त आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली का? प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम