सुप्रिया सुळेंनी केले भाजपचे नामकरण ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ ।  सुप्रिया सुळे गेल्या काही दिवसांपासून आपला मतदारसंघातील संपर्क दौरा वाढविला आहे. आज त्या पुरंदर मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपवर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी भाजपचं “भारतीय जनता लॉन्ड्री” असं केलं नामकरण केलं आहे. यामागचं कारणही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, की भारतीय जनता पार्टीत येणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांना क्लीनचीट दिली जाते. म्हणून मी आता या पार्टीला भारतीय जनता लॉन्ड्री असंच नाव म्हणते. सध्या भाजपात जुन्या जानत्या निष्ठावंतांवर अन्याय केला जात आहे, तर आयारामांना रेड कार्पेट टाकलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की मुख्यमंत्री मंत्रिमंडळ मंत्रालयात कधी दिसतच नाहीत, ना कधी ते शेतकऱ्याच्या बांधावर जातात. ते मला फक्त सत्कार समारंभातच दिसून येतात. हे सरकारच मुळी नियमबाह्य आहे. विरोधकांची दडपशाही हाच यांचा एकमेव अजेंडा आहे, अशी टीका त्यांनी केली. स्मार्ट सिटीवरुनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, की ‘पुणे बदलतंय…’ ही भाजपची टँग लाईन कालच्या पावसाळी पुरात पुणेकरांना अनुभवायला मिळालीच आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भाजपने या शहराचं वाटोळं केलं. ट्राफिकची तर पुरती वाट लावून टाकली, असा आरोप त्यांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम