मोबाईल स्क्रोल करताय होवू शकतो हा गंभीर आजार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ ऑगस्ट २०२३ | सध्याचे युग सोशल मिडियाचे जरी असले तरी यापासून लांब राहण खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक आजाराचा देखील सामना करावा लागत असतो. मोबाईल स्क्रोल करण्यामुळे देखील अनेकांना मोठे आजार सुरु झाल्याच्या घटना घडल्या आहे. डॉक्टरांनी या सवयीला एक नवीन आजार मानून याला मास सायकॉजेनिक इलनेस म्हणजे MPI असं नाव दिलं आहे.
हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या एका स्टडीनुसार, फार जास्त रील्स बघणाऱ्या लोकांमध्ये ही लक्षण स्पष्ट दिसतात. या आजारात लोक नेहमीच बोलताना आपले पाय हलवतात. हे या आजाराचं एक पहिलं आणि मुख्य लक्षण आहे.

हेल्थ एक्सपर्टनुसार, रोज बराच वेळपर्यंत मोबाइल फोन स्क्रोल करण्याने कंबर आणि मानदुखीची समस्या वाढते. मोबाइल बघण्यासाठी तुम्ही जेवढा वेळ मान झुकवता, त्याने मानदुखी आणि मणक्याचीही समस्या होते. बराचवेळी रील्स बघितल्याने लोकांचा फोकस कमी होतो. ते कोणताही व्हिडीओ शेवटपर्यंत न बघता एका व्हिडिओवरून दुसऱ्या व्हिडिओवर पोहोचतात. हळूहळू ही त्यांची सवय बनते आणि ते कोणत्याही गोष्टीवर फोकस करू शकत नाहीत. ते सतत अस्वस्थ राहतात. मोबाइलवर जास्तीत जास्त वेळ घालवल्याने लोकांना झोप कमी येणे, मायेग्रेन, डोकेदुखी आणि डिप्रेशनची समस्या होऊ लागते. कारण मोबाइलमधून निळा प्रकाश निघतो, जो डोळ्यांना नुकसान पोहोचवतो. सोबतच डोकेदुखीही वाढवतो. अशा लोकांमध्ये शांत झोप न लागण्याची समस्या अधिक असते. झोप जर पूर्ण झाली नाही तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम