फेसबुकवरून होणार बातम्या गायब ; मेटाचा मोठा निर्णय !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ ऑगस्ट २०२३ | जगभरातील अनेक देशातील बातम्या आपल्याला लागलीच मिळत असतात, पण आता याच बातम्या आपल्या पर्यत पोहचू शकणार नाही, त्यामुळे बातम्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून आता बातम्या शेअर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबतच, न्यूज पोर्टलच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या बातम्यांच्या लिंक्स हटवण्यास मेटाने सुरूवात केली आहे. कॅनडामध्ये ही कारवाई करण्यात येत आहे.

कॅनडा सरकारने ऑनलाईन न्यूज कायदा पारित केल्यानंतर मेटाने हे पाऊल उचललं आहे. या कायद्यावर मेटा आणि गुगल या दोन मोठ्या कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या तरी केवळ कॅनडा देशामध्येच ही कारवाई करण्यात येत आहे. कॅनडाच्या संसदेने Online News Act हा कायदा पारित केला आहे. या कायद्यानुसार गुगल, फेसबुक अशा प्लॅटफॉर्मवर जर बातम्यांच्या लिंक्स शेअर करायच्या असतील, तर त्यांना कॅनडामधील न्यूज पब्लिशर्सना त्या बदल्यात पैसे द्यावे लागतील. यासाठी गुगलची पॅरंट कंपनी असलेल्या अल्फाबेट आणि फेसबुकची पॅरंट कंपनी असलेल्या मेटाला कॅनडातील वृत्तसंस्थांशी करार करावा लागेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम