मोदी सरकार आरक्षण देण्यास गंभीर नाही ; मनोज जरांगे पाटील !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ ऑक्टोबर २०२३

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली असून त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गंभीर नसल्याचा आरोप केला. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. ते गरिबांची दखल घेतील, असे आम्हाला वाटत होते. पण याविषयी थोडीशी शंका आहे, असे ते म्हणाले.

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत मंगळवारी संपुष्टात आली. त्यानंतर बुधवारपासून त्यांनी आपल्या पूर्वनियोजित घोषणेनुसार आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.

मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही मागेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरक्षणाच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. हा अत्यंत गंभीर विषय आहे. मराठा समाजाची संख्या मोठी आहे. आम्हाला वाटायचे की, मोदींना गोरगरीबांच्या प्रश्नांची जाणिव आहे. पण ते खरोखरच गरीबांची दखल घेतात का याविषयी थोडी शंका आहे. पंतप्रधान मोदींना आरक्षणाच्या मुद्यावर बैठक घेण्याची कोणतीही गरज नाही. त्यांचा एक फोन या तिघांना (शिंदे, फडणवीस, अजित पवार) येऊ द्या. त्यानंतर सायंकाळी 4 वाजेपर्यंत आरक्षणाचा कागद येईल. हे दणादण पळत येतील. आरक्षण दिल्याची ब्रेकिंग होईल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम