फडणवीसांना चाणक्य म्हणणे पटत नाही ; अंधारे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ ऑक्टोबर २०२३

राज्यात ठाकरे गटाचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाले यावेळी अनेक नेत्यांनी सरकारमधील पक्षावर टीकास्त्र सोडले यात महिला नेत्या सुषमा अंधारे देखील मागे नाहीत त्यांनी देखील गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना लोक चाणक्य म्हणतात. मला ते पटत नाही. कारण चाणक्याने माणसे घडवायची असतात. उदाहरणार्थ शरद पवार यांनी हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ यांना घडवले. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडवलं? उलट विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे संपवल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. तुमचा पक्ष इतका मोठा आहे तर मग शिवसेनेतून आणि राष्ट्रवादीतून उचलेगिरी का करत आहेत असा प्रश्‍न ही त्यांनी फडणवीसांना केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम