भर चौकात विचित्र अपघात : ट्रकच्या धडकेत वाहने एकमेकांवर आदळलीत

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ ऑक्टोबर २०२३

राज्यातील अनेक छोट्या मोठ्या महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना पुणे शहरातील नवले पुलाजवळ एक विचित्र अपघात झाला आहे. भरधाव ट्रकची जोरदार धडक बसल्याने सिग्नलला उभी असलेली वाहने एकमेकांवर आदळलीत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कात्रज देहू बाह्यमार्गावर कात्रज चौकाकडून येणारा सिमेंटने भरलेला ट्रक भरधाव वेगात होता. नवले पुलाजवळ चौकात पोहचल्यावर ट्रकने सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली. यामध्ये सलग उभी असलेली ५ वाहने एकमेकांवर आदळली.

या दुर्घटनेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून संदेश बानदा खेडेकर असे तरुणाचे नाव आहे. अपघातग्रस्त वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्याची व्यवस्था केली. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी सिंहगड वाहतूक विभागाचे कर्मचारी अधिकारी हजर असल्याने तात्काळ मदत मिळाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम