शेतकऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट : ६ पिकांच्या MSP मध्ये वाढ

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ । PM किसानचा 12 वा हप्ता जारी केल्यानंतर केंद्र सरकारने आणखी शेतकऱ्यांना दिवाळी भेट देत रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. मंत्रिमंडळाने गव्हाच्या एमएसपीमध्ये 110 रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यासह, 2023-24 साठी गव्हाचा एमएसपी प्रति क्विंटल 2,125 रुपये झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

गव्हाशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने मसूरच्या एमएसपीमध्येदेखील कमाल 500 रुपये प्रति क्विंटल दर मंजूर केला आहे. आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत 2022-23 साठी 6 रब्बी पिकांची एमएसपी निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये गव्हासाठी 110 रुपये, बार्ली 100 रुपये, हरभरा 105 रुपये, मसूर 500 रुपये, मोहरी 400 रुपये तर, करडईच्या एमएसपीमध्ये 209 रुपयांची वाढ करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्राने गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल या पिकांच्या नवीन किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने गव्हाच्या एमएसपीमध्ये 110 रुपये प्रति क्विंटलने वाढ केली आहे.त्यामुळे आता रब्बी हंगाम 2023-24 साठी गहू 2,125 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे.

बार्लीचा जुना एमएसपी 1,635 रुपये होता. यामध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता तो 1,735 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे. हरभराचा जुना एमएसपी 5,230 रुपये होता, ज्याच्या एएसपीमध्ये 105 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हरभऱ्याची नवीन एमएसपी 5,335 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. मसूरचा जुना एमएसपी 5,500 रुपये प्रति क्विंटल होता. ज्यामध्ये 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मसूराल 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार आहे. याशिवाय मोहरीच्या एमएसपीत 400 तर, सूर्यफुलाच्या भावात प्रतिक्विंटल 209 रुशेतकऱ्यांना मोडी सरकारची दिवाळी भेट : ६ पिकांच्या MSP मध्ये वाढपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम