उर्फी जावेद झोक्यावरुन घसरली ; चाहत्याची गर्दी जमली

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ । उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते, तरी सुद्धा सोशल मिडीयावर इतक्या कमी वयात चाहत्याची गर्दी खेचण्यात कमी पडत नाही, मात्र ती सध्या तिच्या गाण्यामुळे चर्चेत आहे. तिच्या ’हाय हाय ये मजबुरी’ या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याला आठ दिवसातच 7 मिलिअनहुन जास्त व्हुज आले आहेत. ती या गाण्यावर अनेक रिल स्टारसोबत थिरकतांनाही दिसली. तिने नुकताच या गाण्याशी संबधित व्हिडिओ शेअर केला आहे.

 

तिच्या इंस्टाग्राम हँडलवरील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तिनं तिच्या गाण्याच्या सेटवरील BTS व्हिडिओ शेअर केला. ‘हाय हाय ये मजबूरी’ गाण्यादरम्यान उर्फी सुंदर साडी परिधान करुन श्रावणात खेळण्यात येणाऱ्या झोक्याचं वर्णन करत नाचतांना दिसत आहे. तेव्हा अचानक ती झोक्यावरुन घसरली, परंतु तिच्यासोबत नाचणाऱ्या कलाकारांनी तिला लगेच पकडले आणि सावरले.यावर तिनं फनी कॅप्शन देत गाण्याप्रमानेच ‘हे खरंच हाय हाय झालं असतं’ असं लिहिलंय. तिच्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी तिची काळजीने विचारपुस करत आहेत तर काहीजण तिला लागलं नाही म्हणुन आनंद व्यक्त करत आहेत.त्यातच अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. तिच्या या पोस्टवर 98 हजाराच्यावर लाइक्स आले आहेत. वाढदिवस साजरा केल्यानंतर ती पुन्हा कामाला लागली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम