राऊत हे नारद मुनीचे पात्र ; आमदार शहाजी पाटील

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ ।  राज्यातील अंधेरी पूर्व पोट निवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले असले, तरी खासदार संजय राऊत यांनी ही ठरलेली स्क्रिप्ट होती, असा टोला लगावल्याने शिंदे गट चांगलाच आक्रमक झालेला आहे. यावर प्रतिक्रिया देत आमदार शहाजी पाटील यांनी खासदार संजय राऊत हे नारद मुनीचे पात्र आहे; तुरुंगातूनही काडी पेटवताय असा टोला लगावला आहे.

शिदें गटातील आमदार शहाजी पाटील म्हणाले की, भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला यातून राज्याची संस्कृती पुढे येताना दिसत आहे. राजसाहेबांच्या पत्राची दखल फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन पुढील कार्यवाही केली, असे सांगतानाच संजय राऊत हे नारद मुनीचे पात्र आहे. तुरुंगातूनही काडी पेटवत आहे.

पुढे बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करावा, अशी माझी इच्छा आहे. म्हणून अभिजीत पाटील यांच्याबाबत विधान केले. माझी विधानसभा निवडणुकीत माघार नाही. सगळे विरोधक मिळून या, भुगा करुन तुम्हाला निवडणुकीत पाडून मी पुन्हा आमदार म्हणून मुंबईला जाईल, असा दावा त्यांनी केला. आम्हीच खरी शिवसेना आहे हे जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरेंना भारत जोडो यात्रेचे निमंत्रण देण्यावरुनही शहाजीबापू म्हणाले की, ही बाळासाहेबांच्या विचारांशर प्रतारणा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम