मोदी अकेला नही चलेगा ; ठाकरे गटाचा दावा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ सप्टेंबर २०२३ | राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विविध मुद्यावर बोलत भाजपला चांगलेच खडसावले आहे.

संजय राऊत म्हणाले कि, 2024च्या आधी भाजप हा फुटलेला पक्ष असेल. भाजप फुटणार, असा मोठा दावा देखील त्यांनी केला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी निर्माण झाल्यानंतर भाजपला एनडीएची आठवण झाली. तोपर्यंत एनडीए दिसतही नव्हते. तसेही एनडीएमध्ये इकडून तिकडून लोकं घेतले आहेत. शिवसेना आणि अकाली दल नसेल तर एनडीए शून्य आहे. एनडीएची ताकद शिवसेना आणि अकाली दल होती. बाकीचे लोक येतात जातात. सध्या एनडीए अस्तित्वातच नाही.

आताची एनडीए म्हणजे एक नौटंकी आहे. त्यामुळे एनडीए राहील की नाही माहीत नाही. 2024मध्ये भाजपही फुटलेला पक्ष असेल, याची मला खात्री आहे. पूर्वी मोदी है तो मुमकीन है. मोदी काफी है, अशा घोषणा भाजप कार्यकर्ते देत होते. मात्र, आमच्या इंडिया आघाडीनंतर त्यांनाही एनडीएची आठवण झाली आहे. थोडक्यात अकेला मोदी काफी है, असे चित्र सध्या नाही. इंडिया निर्माण झाल्यावर मोदी अकेला नही चलेगा, ही जाग भाजपला आली. त्यामुळे त्यांनी इथूनतिथून लोक जमा केले. आताची एनडीए ही कमकुवत आहे. आता एआयडीएमके पक्ष एनडीएतून बाहेर पडला आहे. अजून काही लोक भाजपमधून बाहेर पडतील. एवढेच नव्हे तर भाजपही फुटेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम