पंतप्रधान मोदी आज देणार नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे !
बातमीदार | २६ सप्टेंबर २०२३ | देशात गेल्या काही वर्षापासून अनेक तरुण तरुणी बेरोजगारीच्या विळख्यात पडले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये 51,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे (ऑफर लेटर) देतील. पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी सांगितले की, पंतप्रधान नरेद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही नियुक्ती पत्रे वितरित करतील आणि उमेदवारांना संबोधित देखील करतील. देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळावा होणार आहे.
राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोस्ट विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, मंत्रालय यासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये हे तरुण काम करतील.
नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना iGOT कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन मॉड्यूल, कर्मयोगी प्रारंभद्वारे त्यांचे कौशल्य वाढवण्याची संधी मिळणार आहे. कोणत्याही डिव्हाइसवरून आणि कोणत्याही ठिकाणाहून शिक्षण घेता येईल, असे 680 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम या मोड्यूलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नवनियुक्त उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश समर्थित उपक्रमात सामावून घेतले जाणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम