मुंबई महिलेचा धिंगाणा : म्हणाली मोदींना फोन कर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ सप्टेंबर २०२३ देशभरातील अनेक महिलांचा धिंगाणा घालत असल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतांना एक धक्कादायक घटना मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर घडली आहे. केवळ चार चाकी वाहनांना परवानगी आहे. तरीही अगदी तोऱ्यात आपली बुलेट या सी लिंकवर नेत एका महिलेने वाहतूक पोलिसांसोबत चांगलीच हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘मी गव्हर्नमेंट ऑफ भारत आहे. मोदींना फोन कर तरच मी बुलेटवरुन खाली उतरेन. आणखी पाच मिनिटे मला थांबवले तर तुला ठोकून पुढे जाईल’, अशा शब्दांत या महिलेने उलट वाहतूक पोलिसांनाच धमकावले. महिलेचा पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकवर हेल्मट न घालताच ही महिला बुलेटवरुन भरधाव वेगाने जात होती. वाहतूक पोलिसांनी पाहताच तिला अडवले. मात्र, महिलेने वाहतूक पोलिसांसोबतच चांगलाच धिंगाणा घातला. तब्बल 15 मिनिटे हा गोंधळ सी लिंकवर सुरू होता. विनवण्या करुनही महिला ऐकायलाच तयार नसल्याने वाहतूक पोलिसांचीही चांगलीच भंबेरी उडाली. यामुळे सी लिंकवरील वाहतुकीलाही फटका बसला. अखेर पोलिसांनी मुंबई वाहतूक पोलिस कंट्रोल रुमशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. अखेर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. तिच्या विरोधात भादंवि कलम 279 (बेदरकारपणे गाडी चालवणे) आणि कलम 353 (सरकारी कामात अडथळा आणणे) तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, तिची बुलेट देखील जप्त करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम