मोहम्मद शमी धावला अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ नोव्हेबर २०२३

नैनितालमध्ये एका अपघातग्रस्त कारमधील लोकांना मदत करुन सर्वांचीच मने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जिंकली आहेत. शमीने कार अपघातात जखमी झालेल्या लोकांना तर वाचवलेच पण त्यांना मदतही करताना दिसत आहे. शमीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

‘हे खूप भाग्यवान आहेत. परमेश्वराने यांना दुसरं आयुष्य दिलंय. नैनीतालमध्ये एका खोल दरीत कार पडली होती. विशेष म्हणजे ही कार माझ्या गाडीच्या पुढेच धावत होती. त्यामुळे, त्या गाडीला अपघात होताच, आम्ही तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धावलो आणि त्यांना सुरक्षितपणे गाडीतून बाहेर काढले,” अशी माहिती शमीने दिली आहे. या व्हिडिओत शमी आणि त्याचे मित्र अपघातग्रस्तांना मदत करत असल्याचे दिसत आहे.

 

त्याच्या या कृतीचे चाहत्यांनी कौतुक केले आहे. शमीने शेअर केलेल्या व्हिडिओंना आतापर्यंत 5 लाख 80 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर चाहत्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, मोहम्मद शामीने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात दमदार गोलंदाजी केली. मोहम्मद शामीने अवघ्या ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनीही त्याची भेट घेत कौतुक केले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम