पंतप्रधान मोदींच्या प्रेरणादायी शब्दांसाठी सूर्यकुमारने मानले आभार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ नोव्हेबर २०२३

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी शब्दांसाठी शनिवारी त्यांचे आभार व्यक्त केले. पंतप्रधानांच्या प्रेरणादायी शब्दांमुळे पुढील वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ याच उत्साहाने खेळेल.

भारत मागील रविवारी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाकडून सहा गड्यांनी पराभूत झाला. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत १२ वर्षांनंतर विजेतेपद पटकावण्याचे भारताचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाडूंचे सांत्वन करण्यासाठी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. सूर्यकुमार सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व करत आहे. तो म्हणाला की, विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आम्ही ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो आणि तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रूममध्ये आले. त्यांनी आपल्या शब्दांनी आम्हाला प्रेरित केले. ते प्रत्येक खेळाडूला भेटले आणि आम्हाला पराभव विसरून पुढे जाण्यास सांगितले.

सूर्यकुमार म्हणाला की, आम्हाला हा पराभव विसरण्यास काही काळ लागेल, पण, पंतप्रधानांनी पाच मिनिटे सर्वांना प्रेरणा मिळेल असा संवाद साधला. पंतप्रधानांनी आमची भेट घेणे मोठी बाब आहे. कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. आम्ही त्यांचे शब्द लक्षपूर्वक ऐकले, त्यांच्यासोबत वेळ घालवला, आम्ही त्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करू. भारताकडे पुढील वर्षी वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणारा टी-२० विश्वचषक जिंकण्याची संधी असेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम