कुणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार ; मुख्यमंत्री शिंदे !
बातमीदार | ७ नोव्हेबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे हि मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली आहे तर राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी विरोध केला आहे. पण यावर मुख्यमंत्र्यांनी यावर मोठे भाष्य केले आहे. जम्मू कश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळांना दिला आहे. दरम्यान मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत सुरू आहे. आरक्षणावरून भुजबळांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर, वादग्रस्त वक्तव्यानंतर आता महायुतीतील नेत्यांमध्ये वादावादी सुरु झाली आहे. यावरुन शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनीही आपले मत व्यक्त केले असून भुजबळ यांचे कालचे विधान आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहे ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम