मू. जे. तील “सोहम”तर्फे एक दिवसीय योग कार्यशाळा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जामनेरात उपक्रम

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ११ एप्रिल २०२४ | जळगाव येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम झाला. यात संकल्प व्यसनमुक्ती केंद्र, जामनेर येथे निवासी व्यसनाधिन व्यक्तींसाठी एक दिवसीय योग कार्यशाळा झाली.

व्यसनाधिन व्यक्तींना या कार्यशाळेतून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग साधनेचे महत्व पटवून देण्यात आले. तर त्यांच्याकडून योग प्रात्यक्षिके सुद्धा करून घेण्यात आले.

या कार्यशाळेला सोहम योग विभागातील प्रा. ज्योती वाघ यांनी मार्गदर्शन केले. यात व्यसनांपासून दूर राहण्यासाठी योग साधना कशी उपयुक्त ठरू शकेल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनमुक्त, स्वास्थपूर्ण व आरोग्यदायी जीवनासाठी नित्य योगसाधना करण्याचा संदेश या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आला.

सदरप्रसंगी व्यासपीठावर संकल्प व्यसनमुक्ती केंद्राच्या अध्यक्षा शालिनी सोनार उपस्थित होत्या. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी व आयोजनासाठी “सोहम”चे संचालक डॉ. देवानंद सोनार आणि विभागातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम