सौ. रजनीताई देशमुख महाविद्यालयात रासेयोच्या वतीने ‘फिट इंडिया फ्रीडम रन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या स्वयंसेवकांची दौड संपन्न झाली. यात स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नागरिकांमध्ये आरोग्यासंबंधी जनजागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमाच्या आयोजनाचा उद्देश होता.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. व्ही. चिमणकर, सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम