…निर्णय मान्य राहील ; उपमुख्यमंत्री अजित पवार !

बातमी शेअर करा...

राज्यातील शिवसेनेत गेल्या काही महिन्यापासून एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार काम करत आहे. या सरकारमध्ये मी एक वर्षानंतर सहभागी झालो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत दाखल असलेल्या याचिकांबाबत निवडणूक आयोगाकडून दोन्ही बाजू ऐकून घेतल्या गेल्या आहेत. त्यानंतर निवडणूक आयोग आपला निर्णय जाहीर करणार आहे आणि निवडणूक आयोग जो अंतिम निर्णय देईल तो मला तरी मान्य असणार आहे, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले आहे.

सोमवारी पुणे दौऱ्यावर अजित पवार आले होते. गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत दौऱ्यावर असताना पवार हे पुण्यात असल्याने त्यांनी शाहांचा दौरा टाळला का, याबाबतही पत्रकारांनी विचारणा केली असता अजित पवार म्हणाले, गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा जाहीर होण्यापूर्वी माझा २३, २४ आणि २५ सप्टेंबरचा दौरा निश्चित करण्यात आला होता. शाह हे मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्या घरी गणेश दर्शनासाठी जाणार होते. याबाबत मला कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे मी पूर्वनियोजित कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी पुण्यात आलो आहे. दरम्यान, पुण्यातील गणेश दर्शन आणि राज्यातील सत्तासंघर्षाबाबतही त्यांनी उत्तरे दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम