मुस्लिम कब्रस्तानात धुमाकूळ घालणारा मादी कोल्हा भिंतीवर आदळल्याने मृत… वन अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी, नियमानुसार अंत्यसंस्कार…

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख) शहरातील गांधलीपुरा जवळील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानमध्ये दीड वर्षीय कोल्हा मादीने धुमाकूळ घातला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. यावेळी नागरिकांची गर्दी जमल्याने घाबरलेला हा कोल्हा कब्रस्तानाच सैराभर पळू लागल्याने क्रबस्तानाच्या भिंतीचा अंदाज न आल्यावर त्यावर आदळले जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती पत्रकरांना मिळाल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर तत्काळ वन विभागाचे अधिकारी दाखल झाले. ते मृत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यावर वन विभागाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करून त्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गांधलीपुरा जवळ मुस्लिम बांधवांचे कब्रस्तान आहे. यामध्ये शनिवारी २४ सप्टेंबर रोजी दीड वर्षीय (मादी) कोल्हा असल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे येथे नागरिकांची गर्दी जमल्याने गर्दीला पाहून कोल्हाने पळ काढण्यास सुरुवात केली. त्याला निघण्यासाठी जागा नसल्याने तो कब्रस्थानातच सैरावैरा पळू लागला. कब्रस्थानातून बाहेर पडण्यासाठी तो धापळ करीत असतानाच तो भिंतीवर जोरात आदळल्याने त्याचा जागीत मृत्यू झाला. तो दमून खाली पडला असेल म्हणून नागरिक त्याच्याजवळ जाण्यास घाबरत होते. म्हणून त्यातील काही मुस्लिम बांधवांनी पत्रकारांना संपर्क करून हकीकत सांगितली असता पत्रकार यांनी वन विभागातील वनपाल पी. जे. सोनवणे यांना मोबाईल कॉलद्वारे कळवले. त्यानंतर लगेच ते काही क्षणात घटनास्थळी पोहचल्यावर त्यांनी पाहणी केली तर कोल्हा मृत झालेला होता. याबाबत वनपाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन मार्गदर्शन मागवले. त्यावेळी वरिष्ठांच्या सूचनेनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन त्याच जागी शवविच्छेदन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोल्हा मादी असल्याने पोट चिरून पिल्लं आहेत की नाही खात्री करून अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. या वेळी वनपाल पी. जे. सोनवणे, वनरक्षक कामदास वेळसे, वनरक्षक सुप्रिया देवरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ मुस्लिम बांधव सत्तार मास्टर तेली, हाजी नासिर, अबिद मिस्तरी नावेद शेख, कमाल पेंटर, युनूस मेवाती, अख्तर अली सैयद आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम