डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ नोव्हेबर २०२३

संसदेचे हिवाळी अधिवेशन आगामी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे अधिवेशन नाताळ (२५ डिसेंबर) पूर्वी समाप्त होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. प्रमुख गुन्हेगारी कायद्यांच्या जागी तीन विधेयके संसदेत मांडली जाण्याची शक्यता आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम आदी राज्यांत सध्या विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. त्याच्या काही दिवसांतच संसदेचे हिवाळी अधिवेशन भरण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीने तीन विधेयकांचा अहवाल स्वीकारला आहे. या संबंधित विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर करणे व त्यावर चर्चा होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, दरवर्षी हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होत असते व २५ डिसेंबरला ते संपत असते. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त नियुक्ती संबंधित प्रलंबित विधेयक चर्चेसाठी येणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम