आता आधार कार्डमध्ये मोफत होणार बदल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  देशात प्रत्येक नागरिकांना आधार कार्ड अनिवार्य केले आहे. तर नुकतेच राज्यातील अनेक शाळेमध्ये मुलांचे प्रवेश घेण्यासाठी आधारकार्ड लागत असते. यावेळी तुम्हाला जर हे आधार कार्ड काढायचे असल्यास व यात काही सुधारणा करायची असल्यास आधार जारी करणारी संस्था UIDAI लोकांना आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत देत आहे. UIDAI ने ही सुविधा 15 मार्च ते 14 जून दरम्यान दिली होती.

UIDAI ने माहिती दिली होती की लोक 3 महिन्यांच्या आत ऑनलाइन आधारकार्ड फ्रीमध्ये अपडेट करु शकता. दुसरीकडे, जर तुम्ही आधार केंद्रावर जाऊन माहिती अपडेट केली तर तुम्हाला आधार अपडेटची सुविधा फ्रीमध्ये मिळणार नाही. ही सुविधा मिळवण्यासाठी UIDAI च्या पोर्टलल व्हिजिट करा.

तुम्ही आजच नाव, पत्ता, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, लिंग, बायोमेट्रिक, फोटो इत्यादी अनेक डिटेल्स फ्रीमध्ये अपडेट करू शकता. तुम्हाला तुमचे डिटेल्स फ्रीमध्ये अपडेट करायचे असल्यास, आजच https://myaadhaar.uidai.gov.in/ वर क्लिक करा. यानंतर Proceed To Update हा ऑप्शन निवडा.
यानंतर, तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही डिटेल्स निवडू शकता आणि ते अपडेट करू शकता. माहिती अपडेट करण्यासाठी आयडी प्रूफची स्कॅन कॉपी, मोबाइल नंबर यासारख्या गोष्टी आवश्यक आहेत. तुम्ही आज ऑनलाइन आधार अपडेट केले तर तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये फीस भरावी लागणार नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम