अभिनेत्रीच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रीचे खासगी आयुष्य सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत येत असते. असे असतांना सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सध्या आता वेगळ्याचा कारणांमुळे चर्चेत आलेली आहे. ती म्हणजे शिल्पाच्या राहत्या घरी मोठी चोरी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे.

चोरांनी शिल्पाच्या घरातील महागड्या वस्तूंची चोरी केल्याचे दिसून आले आहे. अभिनेत्रीनं याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. जवळपास एक आठवड्यांपूर्वी ही चोरी झाल्याची बातमी समोर आली असून पोलिसांनी त्या चोरांना अटक केली आहे. पोलिसांनी त्या चोरांकडून शिल्पाच्या घरातून चोरी केलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. याप्रकरणी शिल्पानं जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी देखील शिल्पा वेगवेगळ्या कारणामुळे अडचणीत आल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर शिल्पाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इंस्टावर तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम