घरीच करा उपाय ; महिलांनो केस गळती थांबवा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  अनेक महिलांचा जीव आपल्या केसात असतो पण अनेकांना केस गळती व दाट होत नसल्याच्या तक्रारी असतात पण आता महिलानो तुम्ही चिंता करत बसू नका. तुम्ही घरच्या घरी उपाय करु शकतात. आम्ही तुम्हाला कढीपत्त्याची एक पद्धत सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी मिक्स कराव्या लागतील आणि त्या केसांना लावल्यानंतर केसांची लांबी वाढेल, तसेच केस गळणे आणि तुटणे देखील कमी होईल. चला तर मग केस गळती रोखण्यासाठी काय उपाय आहे, ते जाणून घ्या.

आपण केसांची निघा योग्य प्रकारे राखली नाही तर केसांची समस्या डोके वर काढते. केस गळतीमुळे टक्कलही पडते. तसेच आजकाल, लोकांमध्ये लांब केस ठेवण्याचा छंदही दिसून येत आहे. तर दुसरीकडे ज्या लोकांना केसांची वाढ मंदावली आहे, ते केस वाढवण्याचा पर्याय निवडत आहेत. असे असले तरी त्यांना त्यासाठी महागडा खर्च उचलावा लागतो. मात्र, आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगत आहोत ज्याचा वापर करुन तुम्ही एका महिन्यात केसांची वाढ चागली करु शकता आणि यासाठी तुम्हाला केवळ एक रुपया खर्च करावा लागेल. आम्‍ही तुम्‍हाला कढीपत्त्याचा महत्त्वाचा एक उपाय सांगत आहोत, ज्यात तुम्‍हाला दोन गोष्टी मिक्स करायच्या आहेत. ते तेल केसांना लावल्‍याने केसांची लांबी वाढेल, तसेच केस गळणे आणि तुटणे देखील कमी होईल. जाणून घ्या, घरी हे तेल कसे तयार करायचे ते.

घरी कसे बनवायचे कढीपत्त्याचे तेल?
घरी कढीपत्त्याचे हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला चार चमचे खोबरेल तेल, मूठभर कढीपत्ता आणि 20 ग्रॅम मेथीची गरज आहे. हे बनवण्यासाठी तुम्हाला फार कष्ट करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त हे तिन घटक खोबरेल तेलात मिसळून उकळायचे आहे. मेथीचे दाणे आणि कढीपत्ता मऊ आणि लवचिक होईपर्यंत ते उकळत राहा.
आता तुम्ही गॅस बंद करुन मेथी दाणे आणि कढीपत्ता नीट मिक्स करुन घ्या. नंतर ते थंड होण्यासाठी ठेवा आणि काचेच्या बाटलीत गाळून भरु ठेवा. आता तुम्ही आठवड्यातून दोन दिवस या तेलाची मालिश करुन केसांचे आरोग्य सुधारु शकता. यामुळे तुमच्या केसांची लांबी वाढेल तसेच केस गळणे आणि तुटणे कमी होईल. हे तेल केसांना तुटण्यापासून वाचवते. त्यामुळे आजपासूनच या तेलाने डोक्याचा मसाज सुरु करा आणि बघा तुमचे केस कसे काळे, घट्ट आणि लांब होतील ते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम