आता सोशल मिडीया वापरण्यासाठी लागणार वयाची अट ?
जगभरातील अनेक लोक दिवसापासून मोठा वेळ सोशल मिडीयावर देत असतात. यातून काही लोकांनी आपल्या उद्योग सुरु केले आहेत तर काही तरुण चुकीच्या मार्गाला लागल्याचे नियमित दिसून येत असते. सध्या हायस्पीड इंटरनेटमुळे आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्येष्ठ व्यक्तींसह तरुण आणि लहान मुलेही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. अशातच कर्नाटक हायकोर्टाने मुलांच्या सोशल मीडियावर वापराबाबत एक महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. मुलांच्या सोशल मीडिया प्रवेशासाठी वय निश्चित करण्यात यावे, असं उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतरच मुलांनी सोशल मीडियाचा वापर करावा, असंही हायकोर्टाने सांगितलं आहे. मद्यपान करण्यासाठी वयोमर्यादा आखून देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे याचा देखील विचार व्हावा असे , असंही कोर्टाने सूचवलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला १ हजार ४७४ खाती, १७५ ट्वीट, २५६ यूआरएल आणि एक हॅशटॅग हटवण्याचे आदेश दिले होते. यापैकी ३९ यूआरएलच्या संदर्भातील आदेशाला ट्विटरने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
या याचिकेवर कर्नाटक हायकोर्टाचे न्यायमूर्ती जी. नरेंद्र आणि न्यायमूर्ती विजयकुमार ए. पाटील यांच्या खंडपीठाने मंगळवारी सुनावणी घेतली. तसेच या प्रकरणात न्यायालयाने एक्स कॉर्पला ५० लाखांचा खर्च देण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर बंद घातल्यास भलेच होईल, आज शाळेत जाणाऱ्या मुलांना त्याचे व्यसन लागले आहे. जशी मद्यपानासाठी वयोमर्यादेची अट असते, तशी अट सोशल मीडिया वापरायला सुद्धा हवी. सरकारने समाजमाध्यमांच्या वापरासाठी वयोमर्यादा लागू करण्याचा विचार केला पाहिजे. अशी टिप्पणी देखील हायकोर्टाने केली आहे. दरम्यान, कर्नाटक हायकोर्टाच्या या टिप्पणीनंतर आता सोशल मीडिया वापरण्यावर वयाची अट येणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम