आता झोपताना तोंडाला लावा चिकटपट्टी ; हे होतील फायदे !
दै. बातमीदार । १९ नोव्हेबर २०२२ नेहमी भरपूर लोकांना रात्री झोप येत नाही किवा त्यांचे तोंड उघडे राहते. ताेंड उघडे ठेवून झाेपल्याने दुर्गंधीयुक्त श्वास, कॅविटी, कर्कश्श आवाज, ओठ फाटण्याचा धाेकाही असताे. यापासून बचाव करण्यासाठी अनेक लाेक ताेंडाला चिकटपट्टी लावून झाेपणे पसंत करत आहेत. त्यामुळे यादरम्यान ते नाकाने श्वास घेऊ शकतात.
एका अध्ययनात ताेंडावर पट्टी लावल्याने घाेरण्यापासून सुटका हाेते असा दावा करण्यात आला आहे. ताेंडाएेवजी नाकाने श्वास घेणे जास्त चांगले आहे. कारण हवा नाकावाटे गाळून जाते. फुप्फुसाचा खालील भाग सक्रिय हाेताे. त्यामुळे दीर्घ आणि पूर्ण श्वास घेता येताे. यातून शरीराला विश्रांती मिळते. ताेंडावर टेप लावण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी काही लाेकांवर प्रयाेग करण्यात आला. त्यात २० पैकी १३ जण पूर्वीच्या तुलनेत कमी घाेरले. ३० जणांवर करण्यात आलेल्या अन्य एका प्रयाेगात ‘स्लीप अप्निया’ (झाेपेत श्वास थांबणे आणि झाेपमाेड) आजार असलेल्यांना अशी पट्टी लावल्याने त्यांचे घाेरण्याचे प्रमाण कमी झाले. क्लीव्हलँड क्लिनिकचे निद्रातज्ज्ञ डाॅ. मार्री हाॅर्वट म्हणाले, यातून वाळूचे कण, अॅलर्जी, राेगकारक तत्त्वे शरीरात जात नाहीत. शरीराचा संसर्गापासून बचाव हाेताे. नाकाने श्वास घेतल्याने नायट्रिट ऑक्साइड नावाचा गॅस तयार हाेताे. ताे रक्तदाब कमी करणे आणि रक्तप्रवाह नियमित करण्यास मदत करताे.
श्वास घेण्याचा त्रास असल्यास टेप लावू नका नाकाने श्वास घेण्याचा त्रास असल्यास ताेंडावर टेप लावू नका, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्याचबराेबर घट्ट टेप मुळीच लावू नका. सहजपणे ताेंडावरून निघून जाईल असा टेप लावावा. पहिल्या दिवशी दहा मिनिटे, नंतर वेळ वाढवावा. टेपची सवय लागल्यानंतरच रात्री टेप लावून झाेपू शकता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम