शरद पवार म्हणाले की, कोण म्हणतं मी म्हातारा झालोय.

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ ऑक्टोबर २०२२ । राज्यात काही दिवसापासून परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. दि २३ रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाऊन पाहणी केली त्यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुरंदरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आवश्यक धोरणे स्वीकारली जात नाहीत अशी टीका शरद पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला आहे. यावेळी एका शेतकऱ्यांने शरद पवारांना या वयात बाहेर फिरू नका, अशी विनंती केली. त्यावर पवारांनी मजेशीर उत्तर दिली. शरद पवार म्हणाले की, कोण म्हणतं मी म्हातारा झालोय. काय पाहिलं तुम्ही? असा प्रश्नही शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. इतकंच नाही तर पवारही आपल्याच या बोलण्यावर मनमुराद हसले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम