‘जुनी पेन्शन योजना’ म्हणजे लोकांच्या पैश्यावर डल्ला !
दै. बातमीदार । ४ मार्च २०२३ । गेल्या अनेक दिवसापासून जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक हेवेदावे सुरु आहेत. यावर राजकीय नेते सुद्धा आपल्या मतांच्या राजकारणासाठी आश्वासन देत संधी सांधून घेत असले तरी काही राज्यांच्या निर्णयाबद्दल रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी नापसंती व्यक्त केली आहे.
हा निर्णय पूर्णत: प्रतिगामी स्वरूपाचा असून, त्यातून सरकारी कर्मचाऱ्यांना लोकांच्या पैशांतून आणखी अधिक विशेषाधिकार मिळतील, असे ते म्हणाले. जुन्या पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या अर्धी रक्कम निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात मिळते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित वेतनातून कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. ही योजना २००३ मध्ये तत्कालीन रालोआ सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ती १ एप्रिल २००४ रोजी बंद करण्यात आली. तिच्याजागी नवी पेन्शन योजना (एनपीएस) आणण्यात आली. या योजनेत कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनातून १० टक्के रक्कम पेन्शन फंडासाठी कपात केली जाते. त्यात सरकार १४ टक्के रक्कम टाकते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम