दिवाळीच्या तोंडावर सोन्यासह चांदी झाली स्वस्त !
बातमीदार | २ नोव्हेबर २०२३
येत्या काही दिवसावर दिवाळी सणाची लगबग सुरु असतांना देशभरात महागाई देखील वाढत पण सध्या सोने-चांदीच्या भावात चढ- उतार सुरूच असून बुधवार, १ रोजी चांदीच्या भावात एक हजार ४०० रुपयांनी घसरण होऊन ती ७१ हजार ६०० रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्याही भावात बुधवारी ३०० रुपयांची घसरण होऊन ते ६१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
चार दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ते ६२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते त्यानंतर ६१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ७३ हजार ५०० रुपयांवर गेलेल्या चांदीच्या भावात २६ ऑक्टोबर रोजी एक हजार रुपयांची घसरण झाली. ३१ रोजी पुन्हा ७३ हजारावर पोहोचली. दुसऱ्याच दिवशी १ नोव्हेंबर एक हजार ४०० रुपयांची घसरण झाली व चांदी ७१ हजार ६०० रुपये प्रति किलोवर आली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम