उमवितील पत्रकारिता विभागातर्फे वेबसंवादाचे आयोजन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ सप्टेंबर २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० ते दुपारी १:३० वाजेदरम्यान ‘माध्यमांची भाषा : काल आज आणि उद्या’ या विषयावर वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख तथा संवाद माध्यमतज्ज्ञ डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राचे माजी कार्यक्रम अधिकारी तथा नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. बबन नाखले आणि मुंबई येथील लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव हे संवाद साधणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व मानवविद्या प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. अनिल चिकाटे हे उपस्थित राहतील.

सदरील वेबिनारचे मुख्य आयोजक विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर, तर सहआयोजक डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे आहेत.

हा वेबसंवाद झूम एपवर घेण्यात येणार आहे. वेबसंवाद सर्वासाठी नि:शुल्क असून यात सहभागी होण्यासाठी झूम आयडी 9423490044 व mcj111 हा पासवर्ड वापरून लॉगिन करता येईल. वेबसंवादमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्य आयोजक तथा विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम