ओवेसी आणि भाजपा हेच खरे राम-श्याम ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ फेब्रुवारी २०२३ । २५ फेब्रुवारी रोजी असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राम-श्यामची जोडी आहेत, ते कधीही एकत्र येऊ शकतात अशा शब्दात त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ठाण्यातील मुंब्र्यात जाहीर सभेत ते बोलत होते.

असदुद्दीन ओवेसी आणि भाजपा हेच खरे राम-श्याम आहेत. शिवसेना आपल्या पायावर मजबूतीनं उभी असल्याचे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलं. जे सोडून गेले त्यांची पर्वा नसल्याचे राऊत म्हणाले. ओवेसी यांची पार्टीचं भाजपची बी टीम असल्याचे लोक बोलत असल्याचे राऊत म्हणाले. जिथं भाजपला जिंकायचे असते तिथं ओवेसी जात असतात. त्यामुळं त्यांनाचं राम-श्यामची जोडी म्हणलं पाहिजे असे राऊत म्हणाले.

पुण्यात चिंचवड आणि कसबा मतदारसंघात मतदान सुरु झालं आहे. सध्या मतदान कमी होताना दिसत आहे. यावरुन संजय राऊतांनी प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, वोटिंग पर्सन्टेज आता जरी कमी असलं तरी ते वाढणार आहे. पुणे आहे ते, त्या पद्धतीनेच मतदानाला सुरुवात होईल. पुणेकर घरी बसणार नाहीत. कसबा आणि चिंचवडमध्ये चांगले मतदान होईल. वाद आणि भांडणे होणार आहेत. कारण सरकारकडून कसबा आणि चिंचवडमध्ये मंत्री जाऊन बसले आहेत. हा दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे राऊत म्हणाले. पराभवा समोर दिसत असेल तर लोकांना गोंधळ घालायला प्रवृत्त करत असल्याचे राऊत म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम