राज्यात पवारांचे शक्तीप्रदर्शनाने दौऱ्याला सुरुवात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ जुलै २०२३ ।  सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणे, ही अपेक्षा आमच्या सर्व सहकार्यांकडून आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. नव्या पीढीचा कार्यकर्ता नाउमेद होवू नये, या अपेक्षेने मी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आज सकाळी गाडीत बसल्यापासून इथे येई पर्यंत, ठिकठिकाणी कार्यकर्ते त्यात 70 ते 80 टक्के तरुण माझ्या स्वागताला आले होते. आम्ही सर्वांनी कष्ठ केले, या लोकांना योग्य दिशा दाखवली तर मला खात्री की सर्व राज्यातील चित्र राष्ट्रवादीला अनुकूल करण्याच्या दृष्ट्रीने दिसून येईल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. साताऱ्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

आज गुरुपोर्णिमेचा दिवस आहे, आणि आजच्या दिवशी एखादी मोहिम सुरू करायची असेल आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी याची सुरूवात केली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या वतीने पहिल्या दिवसापासून ज्यांना नेतृत्त्व दिले, त्यांचे नाव जयंत पाटील आहे. जसे ते प्रदेश अध्यक्ष आहेत तसे ते विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे काही मागणी केली असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. जयंत पाटील हे कायदेशील आणि योग्य काम करतात, ते त्यांचे काम करत असल्याचे सांगत, शरद पवार यांनी अपात्रतेच्या याचिकेवर जास्त भाष्य टाळले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि आपले काका शरद पवार यांना धक्का देत अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, आता या बंडाविरोधात पुन्हा रान उठवण्यासाठी शरद पवार हे बाहेर पडले आहेत. शरद पवार साताऱ्यात पोहोचले असून त्यांनी कराड मधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले. या माध्यमातून पुढील लढाईचे रणशिंग शरद पवार फुंकले. शरद पवार यांच्यासोबत कोल्हापूरचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. या ठिकाणी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम